Anantrao

Sunday, 21 July 2019

गाभा घटक,जीवन कौशल्य व राष्ट्रीय मुल्ये



   🔘गाभा घटक🔘
१. भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास
२. संविधानिक जबाबदा-या
३. राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यासाठी आवश्यक आशय
४. भारताचा सामाईक सांस्कृतिक वारसा
५. समता,लोकशाही व धर्मनिरपेक्षता
६. स्त्री-पुरुष समानता
७. पर्यावरण संरक्षण
८. सामाजिक अडसरांचे निर्मूलन
९.  लहान कुटूंबाचा आदर्श
१०. वैज्ञानिक दृष्टिकोन
११. महिला व अन्य दुर्बल घटकांचे सबलीकरण
१२. बुध्दी,भावना व कृती यांचा समन्वय
१३.जागतिकीकरण व स्थानिकीकरण यांचा मेळ
======================================

💠जीवन कौशल्य💠
१. स्व ची जाणीव
२. समानानुभूती
३. समस्या निराकरण
४. निर्णय क्षमता
५. परिणामकारक संमप्रेषण
६. व्यक्ती-व्यक्तींमधील सहसंबध
७. सर्जनशिल विचार
८. चिकित्सक विचार
९. भावनांचे समायोजन
१०. ताणतणावांचे समायोजन




======================================

🔶राष्ट्रीय मुल्ये🔶
१. संवेदनशीलता
२. वक्तशीरपणा
३. निटनेटकेपणा
४. वैज्ञानिक दृष्टिकोन
५. सौजन्यशिलता
६. श्रमप्रतिष्ठा
७. स्त्री-पुरुष समानता
८. सर्वधर्म समभाव
९. राष्ट्रभक्ती
१०. राष्ट्रीय एकात्मता

मी हल्ली पुस्तकं नाही, माणसंच वाचतोय !

मी हल्ली
पुस्तकं नाही,
माणसंच वाचतोय !

पुस्तकं महाग झालीयत,
माणसं स्वस्त

शिवाय,
सहज सगळीकडे उपलब्ध असतात
माणसं.

बरीचशी चट्कन वाचून होतात,
कधी कधी मात्र
खूप वेळ लागतो
समजायला.

काही तर
आयुष्यभर कळत नाहीत !

सगळ्या साईजची
सगळ्या विषयांची.

छोटी माणसं, मोठी माणसं,
चांगली माणसं, खोटी माणसं.

आपली माणसं, दूरची माणसं,
दूर गेलेली माणसं, जवळची माणसं.

दु:खी माणसं, कष्टी माणसं
कोरडी माणसं, उष्टी माणसं

बोलकी बडबडी, बोलघेवडी माणसं
निमग्न, तिरसट, मूडी माणसं.

पाठीवर थाप मारणारी,
हातावर टाळ्या मागणारी,
थरथरत्या हाताने,
घट्ट धरून ठेवणारी.

मोजकं बोलणारी कविता-माणसं,
कादंबरीभर व्यथा माणसं.

सतत माईक घेऊन ओरडणारी माणसं,
डोळ्यांनी मौन सोडणारी माणसं.

काहींच्या वेष्टनात मजकूरच नाही,
काहींच्या मजकुरात विषयच नाही,

वर्षामागे वर्ष पानं जातात गळत,
काहींची प्रस्तावनाच संपत नाही !

पुस्तकांचं एक बरं असतं,
कितीही काळ गेला तरी,
मजकूर कधी बदलत नाही,

माणसांचं काय सांगू,
वेष्टन, आकार,
विषय, मजकूर
सारंच बदलत बदलत
शेवटी वाचायला
माणूसच उरत नाही.

तरीही शब्द शब्द
वाचतोे मी माणसं,
पानापानातून
वेचतोे मी माणसं.......!