Anantrao

Wednesday, 26 July 2017

बाबा मला वाचन द्या।

🍂 🍃
➖➖➖➖➖➖➖
" बाबा मला वचन द्या !"
.....संध्याकाळची वेळ होती. बळीराम शेतातून आला असता घराच्या दारात त्याची मुलगी व मुलगा लाईट नसल्यामुळे चिमणी समोर घेऊन अभ्यास करत होते. हे पाहून बळीरामला बरे वाटले.आणि म्हणाला, 'पोरावो, खुप आभ्यास करा...! '
असे म्हणुन मुलांच्या आईला आवाज दिला आणि म्हणाला, 'अगं लक्ष्मी..! मला जेवायचं नाही हाय...! तु सकाळी दिलेल्या भाकरीनं पोट माझ टच झाल हाय...!'
असं म्हणत डेर्यातील पाणी पिण्यासाठी घरात गेला असता घरात समशानाची शांतता...! लक्ष्मी पण पाणी पेत होती. बळीराम म्हणाला, 'तु कोरभर भाकरी खायना !'
लक्ष्मी म्हणाली, 'घरात धान्याचा एक दाणा पण नाही हाय.... कशी बशी एक भाकरी केली हाय...! आणि ती भाकरी मुलांना ठेवली हाय...! ही भाकरी खाऊन पोरांना काय देणार म्हणुन कालची कोरभर भाकरी खाल्ली हाय...! धनी तुम्ही पण कालची कोरभर भाकर ठेऊन तीच आज खाल्ली हाय ते मला माहीत हाय ना...?'
बळीराम निशब्द झाला व काही काळ थांबुन म्हणाला, 'लक्ष्मी काय कराव...? पाऊस पाणी नाय हाय...! त्यामुळे शेताचं समशान झालं हाय...!
शेतात काहीच नाय हाय..? मग काय कराव मला समजत नाय हाय...!
आणि उद्या राखी पूनव पण हाय..! आणि पोरीला एक राखी आणुन देण्याची आयपत राहिली नाय...! काय कराव हे उमजत नाय हाय..?
देव शेतकर्यावर का कोपला हाय...? आणि कीती शेतकर्याचा बळी घेणार हाय..? काय माहीत..? शेतात गेल की पोटात कालवतंय..! काय करावं तेपण समजत नाय हाय..?'
म्हणून पोटभर पाणी पिऊन बळीराम बाहेर आला. आणि म्हणाला, 'पोरावो, बिगी बिगी चला... कोरभर भाकरी खावा...!' 
दोन्ही पोर घरात आली...
त्यांना सुद्धा घरची परिस्थिती ठाऊक होती .म्हणून पोर नुसती भाकर खात होती . बळीराम घरात आला. त्याची मुलगी विद्याजवळ येवून बसला... विद्या म्हणाली, 'बाबा थोडं जेवा की...! बळीराम म्हणाला, 'आत्ताच तुझी आय आणि मी जेवलो हाय..!' पण विद्याला घरची परिस्थिती काय आहे याची पुर्ण जाण होती. त्यामुळे ह्या चिमुकलीनं ना स्वता घास घेतला...अन् त्यौ तीच्या बापाला भरवला..!
आणि बापाच्या डोळ्यातून पाणी आले...! स्वत:ला सावरत बाबा शांत झाला. विद्या म्हणाली, 'बाबा ऊद्या राखी पोर्णिम हाय. मला तुमच्या कडुन एक गोष्ट पाहिजे आहे ती तुम्ही देणार ना...? अशी म्हणाली असता बळीराम हो म्हणाला... आणि विद्या जेवण करुन झोपली...!
     मात्र बळीराम जागाच होता.उद्या पोरगी काय मागतीया; या विचाराने तो कासावीस होता... रात्रभर तो बाप झोपला नाही.
सकाळ झाली आणि बळीराम अंघोळ करुन गावात गेला...
एक दोघाला हात ऊसने पैसे मागितले. परंतु त्यांनी नकार दिल्यामुळे बळीराम हाताश झाला...
त्याला काय करावं हे समजत नव्हतं... राख्या घेण्यासाठी सुद्धा पैसे नसल्यामुळे राख्या कशा घेऊन जायच्या; या प्रश्नाने बळीराम व्याकुळ होता. आणि निराश होऊन घरी आला असता; विद्या ही घरी वाट पाहत बसली होती...  बळीराम घरी आल्यावर विद्या म्हणाली, 'बाबा कीती वेळ झालं कुठं गेला होताव...? चला राखी बांधायची हाय...!' बळीराम म्हणाला, 'मी राखी आणली नाही हाय...?'
विद्या म्हणाली, 'माझ्याकडं राखी हाय.'
बळीराम अश्चयचकीत झाला आणि म्हणाला, 'तु राखी कोठून आणली हाय...?  त्यावर विद्या म्हणाली, 'बाबा तुम्ही मागच्या वर्षी करदुडा आणला होता; तोच मी जपुन ठेवला होता. त्याच्या गोंड्याच्या मी दोन राख्या बनवल्या हायत...!
एक भैय्या ला बांधली अन् एक तुमच्या साठी ठेवली हाय...!
हात पाय धुवा आणि मग मी तुम्हाला राखी बांधते...!'
असे विद्या म्हणाली असता बळीराम गेला राखी बांधून घ्यायला.. परंतु त्याच्या मनात विचार होता, की पोरगी रात्रीच म्हणाली हाय,  काय तरी मागणार हाय..? मात्र आपल्या जवळ दमडी पण नाही हाय...? काय करावं..? आणि पोरीला नाही म्हणालं तर... ही पोरगी जिवाला खाईल...! हा विचार बळीरामला सतावत होता. हात पाय पुसून तो पाटावर बसला आणि मुलीनं ओवाळले आणि राखी बांधली... आणि ती म्हणाली, 'बाबा मी जे मागीन ते देणार ना...? बळीराम हिम्मत करत म्हणाला, 'माग..? काय मागायच हाय ते माग...?
विद्या म्हणाली नक्की ना बाबा...! हे ऐकून बळीरामच्या ह्रद्यायाचे ठोके वाढले आणि म्हणाला बोल पोरी..!
विद्या म्हणाली, 'मला वचन द्या कशीबी परिस्थिती असना तुम्ही या परिस्थितीचा हिम्मतीने सामना करायचा...!
तुमच्या शिवाय आमचे कोण हाय या जगात...? दुष्काळाला खचुन आत्महत्या करायची नाय...? आणि मला आयुष्यभर साथ द्यायची ही ओवाळणी मला द्या...!' हे ऐकून बळीराम आणि लक्ष्मीच्या डोळ्यातुन आश्रु वाहू लागले... आणि बळीराम म्हणाला, 'होय पोरी...! मी दुष्काळाचा सामना करीन...! पण... पण आत्महत्या करणार नाही.' हे वचन बळीराम ने विद्या ला दिले. त्यावेळी विद्याला जगातील सर्वात अनमोल ओवाळणी मिळाल्याचा अनंद झाला. तिच्या  चेहऱ्यावरून तसं दिसत होतं...!
🍂🍂🙏👏🌱🍃
..

शिक्षक म्हणजे ??

शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो
ज्याच्य फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे
ज्ञानाची पानं
त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते
अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या
अस्फुट चित्कांरांना
किंवा त्याच्याच रेषेखाली अधांतरी
लटकेली असतात
कित्येक भावनांच्या डोहात भिजून
नतमस्तक झालेली इवालाल्या चेहऱ्याची
निरागस अक्षरे
शिक्षक नसतो कधीच बिचारा
तोच तर असतो सर्वस्वी बादशहा शाळेचा
त्याच्याच स्वमीत्वाने महत्व येत असते शाळेला
तोच तर असतो खरा संशोधक, शास्त्रज्ञ
नखशिखान्त अंधर भरलेल्या चिमूकल्या गोळ्यातून
सूर्याचं तेज बाहेर काढणारा
तो समाज सुधारक क्रांती कारकही तोच
कित्येक चेतनांना पाठबळ असते
त्याच्या समर्थ तत्त्वज्ञानाचे
शिक्षकाला जपावी लागतात
कुतूहलाच्या झाडाची पानं जीवापाड
आणि आकार द्यावा लागतो
एका मुक्त पणे बागडणाऱ्या
निराकार चैत्यनाला...
कधी स्वतःला विसरून बागडावं ही लागतं
जाणून घ्यावी लागतात बोल खोल खोल काळजाच्या आत
निर्ममपणे...
कधी अंधाअ ही प्यावा लागतो बोनबोभाट पणे
तेव्हा कुठे चमकतात उजेडाची किरणं उद्दीष्टांच्या वाटेवर
त्याच्या सोबतील असतेच की खडूची धारदार तलवार अन
फळ्याची ढाल असते पाठीशी
विश्वास ठेवा एक ना एक दिवस अंधार संपून उजेडाचे राज्य येईल.
अन तेंव्हा मात्र शिक्षक म्हणून त्याची प्रतिमा अधिक स्पष्ट दिसेल

तरीही मला लाज नाही वाटली।

निर्लज्ज,..

भारत पर्यटनाला आलेली
ती विदेशी महिला
हातातील चिप्सचे
रिकामे पाकीट फेकण्यासाठी
अर्धा तास डस्टबिन शोधत फिरली...

आणि तिच्याच समोर
संत्र्याची सोललेली साल मी
बिनधास्त रस्त्यात फेकली...

माझ्याकडे रोखलेली तिची
ती प्रश्नार्थी नजर पाहिली
तरीही मला लाज नाही वाटली....

लाज माझ्या बेगडी स्वच्छतेची...!

त्याने बेकायदेशीर काम करण्यासाठी
माझ्याकडे सरकवलेलं नोटांचं पाकीट
मी हळूच खिशात दाबलं...

आणि त्याच्याच मागून
भिकाऱ्यासारखं हात जोडून
मला विनंती करीत आलेल्या
कफल्लक म्हाताऱ्याला
वयाचा दाखला आणायला
मी बळेच पिटाळून लावलं...

त्याच्या डोळ्यातला
तो अश्रूचा थेंब पहिला
तरीही मला लाज नाही वाटली....

लाज माझ्या अधाशी हावरट पोटाची...!

रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या
तिच्या नवऱ्याला इस्पितळात न्यायची
तिने विनंती करताच
माझी नवी कोरी चमचमीत आलिशान कार
रक्ताने माखेल की काय या भीतीने
मी दुसऱ्या मार्गे जात असल्याच सांगून
हळूच टांग मारली...

तिच्या नजरेतली भीक
मी स्पष्टपणे पहिली
तरीही मला लाज नाही वाटली ....

लाज माझ्या दिखावेबाज श्रीमंतीची...!

बलात्काराच्या केसमधून
त्याला निर्दोष सिध्द करताना
मी माझ्या वकिलीची सीमापार गाठली...

बलात्काराच्या बळीची आब्रू
पुन्हा वेशीवर टांगली.
तिच्या डोळ्यातला राग पहिला
तरीही मला लाज नाही वाटली....

लाज माझ्या कायदाप्रिय बुद्धिमत्तेची...!

एअरकंडीशनर मॉल मधून
महागडे कपडे अन शूज खरेदी करून
मी अभिमानाने कार्ड स्वाईप केलं...

फाईव्ह स्टार हॉटेलच्या मेजवानीनंतर
वेटरच्या हातावर
१०० रुपयांची टीप सुध्दा टेकवली...

मात्र बाजारातून भाजी खरेदी करताना
१० रुपयासाठी अपार घासाघिस केली...

त्या गरीब शेतकऱ्याच्या
आर्त विनवणीचा सूर
कानात घुमत राहिला.
तरीही मला लाज नाही वाटली....

लाज माझ्या काटकसरी व्यवहारांची...!

समुद्रात लाखो करोडो रुपयांची रक्कम ओतून
शिवछत्रपतींचे स्मारक उभारण्याच्या
मी खूप गप्पा मारल्या...

पण जिथे माझा राजानं अखेर प्राण सोडला
त्या खऱ्याखुऱ्या स्मारकरूपी रायगडाची मात्र
दयनीय अवस्था केली...

शिवछत्रपतींची तलवार तोडली गेल्याची बातमी
टीव्हीवरती पसरली...

प्रेमी युगुलांची नावं लिहलेल्या
गडाच्या बुरुजांचा आक्रोश
कानठळ्या फोडू लागला
तरीही मला लाज नाही वाटली....

लाज माझ्या नादान शिवभक्तीची...!

गगनभेदी बिल्डींग, शॉपिंग मॉल, मल्टीप्लेक्स,
३ जी- ४ जी अन बुलेटट्रेनच्या जमान्यात
कुणी आरक्षणासाठी तर कुणी
आरक्षणाच्या विरुध्द भांडला...

आदिवासी पाड्यावरचा रुग्ण
वाहतूकसुविधे अभावी अजूनही
झोळीत टाकून आणलेला पहिला...

डॉक्टर म्हणे तो तर रस्त्यामध्येच मेला.
तरीही मला लाज नाही वाटली....

लाज माझ्या विकासाच्या राजकारणाची...!

२६/११ ला मी मेणबत्त्या लावून
श्रद्धांजली वाहिली...

पाकिस्तानशी युद्धाच्या पोकळ गप्पा मारून
देशाखातर मरण्याच्या सिंहगर्जना केल्या...

त्याच पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट
मी चवीने पहिले...

माझ्याच पैशात मी
कित्त्येक कसाब पोसले
तरीही मला लाज नाही वाटली....

लाज माझ्या फुटक्या देशभक्तीची.!

.....

आणि अजूनही मला
लाज नाही वाटत....

माझ्या निर्लज्जपणाची...!!!

*******