Anantrao

Saturday, 20 June 2020





















चाळीसगाव तालुक्यातील टाकळी. प्र. दे.येथील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले सुपुत्र श्री.अनंतराव बापूराव सूर्यवंशी यांना "मुंबई मनपा.महापौर आदर्श शिक्षक" पुरस्काराने बुधवार दिनांक ११/०९/२०१९ रोजी सन्मानित करण्यात आले.शिक्षण क्षेत्रात नि:स्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा व उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी या पुरस्काराने गौरविण्यात येते.
सूर्यवंशी यांचे विद्यार्थांना शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपन्न केलेले आहे तसेच विविध स्पर्धेत प्रथम पारितोषिकमिळवली आहेत.त्यांना परिमंडळ स्तरावरील 'बेस्ट टिचर' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.त्यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, ब्रिटिश कौन्सिल,२१व्या शतकातील शाळा,स्पोकन इंग्लिश,शाळासिद्धी यांसारख्या उपक्रमात तज्ञ मार्गदर्शक म्हणून कामगिरी केलीआहे.ज्ञानरचनावाद, ताणविरहित आनंदीदायी अध्ययन,नवोपक्रम, वाचन एक परमानंद अशा विविध उपक्रमाचे वर्गअध्यापनात कौशल्यपूर्ण वापर केलेला आहे.स्वयं निर्मित ब्लॉग व युटूब चॅनलच्या माध्यमातून राज्यभरातील विद्यार्थी, पालक व शिक्षकांना ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत.
वृक्षारोपण,स्वच्छता अभियान, दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,विविध सामाजिक संस्थेत कार्य व सामाजिक विषयांवर प्रबोधनाचे कार्य ते करीत आहेत.
त्यांनी अनेक राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिसंवादात मनपाचे प्रतिनिधित्व व सक्रियासहभाग घेतलेला आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत प्रमाणपत्र,रोख दहा हजार रुपये,स्मृतिचिन्ह देऊन  महापौरांच्या हस्ते "महापौर आदर्श शिक्षक" पुरस्काराने सूर्यवंशी यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी आमदार. सरदार तारासिंग, शिक्षण समितीअध्यक्षा.अंजलीनाईक,शिक्षणाधिकारी.
पालकरसाहेब व जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.रामकृष्ण व्ही.होसुर व इतर मान्यवर उपस्थित होते सूर्यवंशी यांनी या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांना दिले.

No comments:

Post a Comment