सर्व पालकांना विनंती मुलांना वयाच्या ६ वर्षा नंतरच शाळेत पाठवा.
playing group काय junior kg काय,
अशा शाळांमधे व या वया मधे ( 2 ते 5 ) मौलिक शिक्षण मिळत नाही
" बोबडी व्यथा "
नाही झालो मोठा मला
काहीतरी कळू द्या
नका टाकू शाळेमंधी
पप्पा मला खेळू द्या...
इवलेसे हातपाय इवलेसे बोटं
बोबडे बोल बोलू लागले
दूधपिते ओठं
बालपणचं सुख मला
थोडंतरी मिळू द्या
नका टाकू शाळेमंधी
पप्पा मला खेळू द्या...
छोटे छोटे मित्र आमचे
छोटे छोटे खेळ
दंगा मस्ती करता करता
मस्त जातो वेळ
पडू द्या, रडू द्या,
कपडे सारे मळू द्या
नका टाकू शाळेमंधी
पप्पा मला खेळू द्या...
नर्सरीत म्हणता
खेळायचच असते
प्ले गृप मधे म्हणता
तुझं वय बसते
घराच्याच अंगणात
दुडूदुडू पळू द्या
नका टाकू शाळेमंधी
पप्पा मला खेळू द्या...
सकाळी सकाळी मला
झोप येते भारी
अंशू ऊठ, अंशू ऊठ
मम्मी जागं करी
मम्मीच्या कुशीत मला
थोडावेळ लोळू द्या
नका टाकू शाळेमंधी
पप्पा मला खेळू द्या...
देता काहो पाठीवरती
दप्तराचे ओझे
कळत कसं नाही तुम्हा
काय होईल माझे
भीती वाटे मम्मीच्या
पदराआड दडू द्या
नका टाकू शाळेमंधी
पप्पा मला खेळू द्या...
मोठं झाल्यावर मी
शिकणारच आहे
स्पर्धेच्या जगात मी
टिकणारच आहे
कुटूंबाच्या सस्कारात
पहिल्यांदा घडू द्या
नका टाकू शाळेमंधी
पप्पा मला खेळू द्या...
इंग्रजी शाळा काढून
कमाई करतात
बिच्च्याऱ्या पालकांना
वेठीला धरतात
आग लागो त्या कान्व्हेंटीला
धडधड जळू द्या
नका टाकू शाळेमंधी
पप्पा मला खेळू द्या...
शहाणे माझे पप्पा कसे
हट्ट नका धरू
लोकं करतात तसं पप्पा
तुम्ही नका करू
समजलं का पप्पा आता
एक पप्पी हळू द्या
नका टाकू शाळेमंधी
पप्पा मला खेळू द्या....
Very heart touching. Share if you like.
No comments:
Post a Comment